
India Cricket Schedule 2025: मार्चमध्ये न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम सुरू झाला पण तो मध्येच पुढे ढकलावा लागला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग 2025 एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 9 मे रोजी, बीसीसीआयमधील अंतर्गत सूत्रांनी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची पुष्टी केली. बीसीसीआयच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना मध्यंतरी रद्द करावा लागल्याने हा निर्णय समोर आला. आता लवकरत आयपीएल पुन्हा सुरु होण्याचे चाहते वाट पाहत आहे.
टीम इंडियाचा पुढील सामना असेल 'या' संघाविरुद्ध
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाईल जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिली कसोटी 20 ते 24 जून दरम्यान लीड्समध्ये, दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये, तिसरी कसोटी 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लंडनमध्ये, चौथी कसोटी 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये खेळवली जाईल.
या वर्षी टीम इंडियाला अजूनही 9 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळायचे आहेत. प्रथम, टीम इंडिया कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करेल. जिथे टीम इंडियाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. जिथे टीम इंडियाला तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. टी-20 मालिका 26 ऑगस्टपासून सुरू होईल, तर शेवटचा सामना 31 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
हे देखील वाचा: IPL 2025 पुन्हा सुरू होण्यापूर्वी RCB मोठा धक्का? मुख्य खेळाडू बाहेर जाण्याची शक्यता
बांगलादेश दौऱ्यानंतर, टीम इंडिया वेस्ट इंडिज संघाचे यजमानपद भूषवेल. दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल तर दुसरा आणि शेवटचा सामना 10 ऑक्टोबरपासून खेळला जाईल.
यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. जिथे टीम इंडियाला तीन एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल. शेवटचा सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. तर टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. मालिकेतील शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल, जिथे टीम इंडिया दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल. शेवटचा सामना 22 नोव्हेंबरपासून खेळला जाईल. एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. शेवटचा सामना 6 डिसेंबर रोजी खेळला जाईल.
तर टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल. मालिकेतील शेवटचा सामना 19 डिसेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यांव्यतिरिक्त, टीम इंडिया 2025 च्या आशिया कपमध्ये देखील खेळेल. तथापि, आशिया कपच्या वेळापत्रकाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.