OnePlus Nord CE 5G (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने आपला नवा स्मार्टफोन OnePlus Nord CE 5G अखेर भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये खूपच जबरदस्त आहेत. यात 6GB रॅम, 8GB आणि 12GB रॅम असे दोन पर्याय दिले आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. येत्या 16 जूनला हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि Warp Charge 30T सपोर्टवाली 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus Nord CE 5G च्या 6GB + 128GB मॉडलची किंमत 22,999 रुपये तर 8GB + 128GB मॉडलची किंमत 24,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडलची किंमत 27,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहेत.हेदेखील वाचा- OnePlus Nord CE 5G आणि OnePlus TV U1S आज भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किेंमत

OnePlus Nord CE 5G मध्ये 6.53 इंचाची FHD+Fluid AMOLED P3 डिस्प्ले देण्यात आली आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट, 20:9 अॅक्स्पेक्ट रेश्यो आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 410ppi डेन्सिटी सपोर्ट करतो. हा डिवाईस Qualcomm Snapdragon 750G 5G प्रोसेसर लेन्स आहे. यात Adreno 619 GPU लावण्यात आला आहे.

या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मोनो लेन्स देण्यात आला आहे. यात 30fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतो. यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लसचा हा फोन Android 11 वर बनलेल्या Oxygen OS 11 वर चालतो.