OnePlus Nord CE 5G आणि OnePlus TV U1S आज भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किेंमत
OnePlus Nord CE 5G & OnePlus TV U1S (Photo Credits: OnePlus India)

चायनीज स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) आज भारतात वनप्लस नॉर्ड सीई 5जी (OnePlus Nord CE 5G) स्मार्टफोन आणि वनप्लस टीव्ही यु1एस (OnePlus TV U1S) लॉन्च करणार आहे. यापूर्वी कंपनीने या डिव्हाईसेसचे काही फिचर्स ट्विटरवर अपडेट केले होते. हा नवा स्मार्टफोन वनप्लस नॉर्डचा अपडेटेड व्हर्जन असणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वनप्लस इंडियाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर लॉन्चिंग सोहळा पाहता येईल. तत्पूर्वी या स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही चे फिचर्स आणि किंमत काय असू शकते, हे जाणून घेऊया... (Amazon Mobile Savings Days Sale 2021 अंतर्गत Realme X7, Oppo F19 Pro+ 5G सह OnePlus च्या स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट; जाणून घ्या ऑफर्स)

OnePlus Nord CE 5G:

OnePlus Nord CE 5G या मोबाईलमध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्ल्पे दिला असून  90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. या हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगनचा 750 जी प्रोसेसर दिला असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 5G (Photo Credits: OnePlus)

या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप असून 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड एंगल लेन्स तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोबाईलमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. या मोबाईलमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली असून 30T Plus  फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

OnePlus TV U1S:

OnePlus TV U1S मध्ये  bezel-less design 4K रिजोल्यूशन देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही 50 इंच, 55 इंच, 65 इंच या साईजमध्ये उपलब्ध असेल. 65 फोगस सेन्सर सह वेबकॅम देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्ही मध्ये मीडिया टेकचा प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त या स्मार्ट टीव्ही मध्ये युएसबी टाईप सी पोर्ट, मायक्रोफोन आणि गुगल असिस्टंट देण्यात आला आहे. यात 30W चे स्पीकर असू शकतात.

OnePlus TV U1S (Photo Credits: OnePlus)

OnePlus Nord CE 5G या स्मार्टफोनची किंमत 22,999 इतकी असू शकते. तर OnePlus TV U1S च्या 50 इंच व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये, 65 इंच वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आणि 55 इंच वेरिएंटची किंमत 42,999 रुपये इतकी असू शकते.