Amazon Mobile Savings Days Sale (Photo Credits: Amazon India)

अॅमेझॉन मोबाईल सेव्हिंग डेज सेलला (Amazon Mobile Savings Days Sale) सुरुवात झाली असून या अंतर्गत विविध स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. सेलमध्ये ई-कॉमर्स कंपनीतर्फे स्मार्टफोन्सवर 40 टक्के सूट देण्यात येत आहे. रियलमी (Realme), सॅमसंग (Samsung), विवो (Vivo), शाओमी (Xiaomi) आणि इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनवर ही सूट देण्यात येत आहे. हा सेल 12 जून पर्यंत सुरु राहणार असून यात नो-कॉस्ट ईएमआय (no-cost EMI), एक्सचेंज ऑफर्स (Exchange Offers) दिल्या जात आहेत. तर जाणून घेऊया सेलमधील ऑफर्स...

OnePlus 9R 5G:

OnePlus 9R 5G हा स्मार्टफोन एक्सचेंज डिल्सतर्फे 2000 रुपयांच्या एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळत आहे. अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर 8 जीबी+128 जीबी मॉडलची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. हा मोबाईल विकत घेताना काही सिलेक्टेड बँकांच्या कार्डवर तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय देखील निवडता येईल. यासोबतच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला 11,100 रुपयांची देखील सूट मिळू शकते.

OnePlus 9R 5G Smartphone Launched (Photo Credits: OnePlus India)

OnePlus 9 &  OnePlus 9 Pro:

OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 3000 रुपयांची सूट मिळेल, ईएमआयचा पर्याय उपलब्ध होईल. (Upcoming Smartphone in June 2021: POCO M3 Pro सह 'हे' दमदार फोन होणार भारतात लॉन्च, येथे पहा संपूर्ण लिस्ट)

OnePlus 9 Pro (Photo Credits: Amazon India)

Oppo F19 Pro+ 5G & Oppo A74 5G:

Oppo F19 Pro+ 5G हा स्मार्टफोन एचडीएफसी बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यास 3000 रुपयांचा इस्टंट डिस्काऊंट मिळेल. तर Oppo A74 5G स्मार्टफोन एचडीएफसी बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यास 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.

Oppo F19 Pro+ 5G (Photo Credits: Amazon India)
Realme X7 (Photo Credits: Amazon India)

रियलमी कंपनीच्या स्मार्टफोनवर देखील या सेल अंतर्गत सूट मिळत आहे. Realme X7 फोन एचडीएफसी बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यास तुम्हाला 750 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय Redmi Note 9, Redmi 9 Power, Samsung Galaxy S20 FE 5G, Galaxy S21 Plus, Galaxy A12, Redmi Note 10 Pro आणि अन्य स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जात आहे.