Upcoming Smartphone in June 2021: जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण जून महिन्यात काही धमाकेदार स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार आहेत. यामध्ये iQoo आणि POCO सह अन्य काही कंपन्या आपले शानदार स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देणार आहेत. तर जाणून घ्या कोणते स्मार्टफोन जून महिन्यात भारतात लॉन्च केले जाणार आहेत. तसेच फोनच्या किंमतीतसह त्याच्या स्पेसिफिकेशनबद्दल अधिक माहिती.
iQoo Z3 हा फोन येत्या 8 जूनला भारतात लॉन्च केला जाणार आहे. या डिवाइस संदर्भातील काही रिपोर्ट्स लीक सुद्धा झाले आहेत. या लीक रिपोर्ट्सनुसार, आयक्यू झेड3 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 19,990 रुपये ठेवली जाणार आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन अॅन्ड्रॉइड11 आधारित iQoo 1.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. या डिवाइसमध्ये 1080X2408 पिक्सल रेजॉल्यूशन असणारा 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. त्याचसोबत यामध्ये Snapdragon 789G प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. ट्रिपल रियर कॅमेरा ही या फोनला दिला जाणार आहे.(Realme पुढील वर्षात लॉन्च करणार जगातील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक)
तसेच पोको कंपनीचा M3 Pro फोन याआधीच चीनमध्ये उतरवण्यात आला. कंपनी आता हे डिवाइस भारतात 8 जूनला लॉन्च करणार आहे. असा अंदाज लावला जात आहे की, या डिवाइसची सुरुवाती किंमत 16 हजार रुपये असू शकते. फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास POCO M3 Pro स्मार्टफोनमध्ये एक 6.5 इंचाचा FHD+LCD डॉट डिस्प्लेचा सपोर्ट दिला आहे. फोन 110 nits पीक ब्राइटनेस, 90Hz रिफ्रेश रेटसह DynamicSwtich फिचरसह येणार आहे. प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity 700 SoC चा वापर केला आहे. जो Mali-G57 MC2 GPU सपोर्ट करणार आहे.
जूनच्या 7 तारखेला Infinix Note 10 आणि Note 10 Pro स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. दोन्ही डिवाइसची विक्री फ्लिपकार्टवरुन केली जाणार आहे. Infinix Note 10 मध्ये 6.95 इंचाचा IPS डिस्प्लेसह FHD+ रेजॉल्यूशचा वापर केला जाणार आहे. डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 SoC प्रोसेसरचा वापर केला आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 आउट ऑफ द बॉक्सवर काम करणार आहे. डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48mp असणार आहे. या व्यतिरिक्त 2MP पोट्रेट लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्सचा सपोर्ट केला जाणार आहे.
तसेच Infinix Note 10 Pro मॉडेलमध्ये 6.95 इंचाचा FHD+LCD डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असणार आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजसह उतरवला जाणार आहे. यामध्ये एक क्वाड कॅमेरा सेटअप दिला असून प्रायमरी कॅमेरा 64MP आहे.