Realme पुढील वर्षात लॉन्च करणार जगातील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक
Realme X5 50 Pro 5G (Photo Credit: Twitter)

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme वर्ल्डट मधील टॉप 5G स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांपैकी एक होण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनी सातत्याने नवे 5G स्मार्टफोन तयार करण्याचा दिशेने काम करत आहे. तसेच रिअलमी कडून गेल्या गुरुवारी अशी घोषणा करण्यात आली की, कंपनी पुढील वर्षापर्यंत 10 हजार रुपयांहून कमी किंमतीमधील एक नवा 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्याचसोबत 5जी स्मार्टफोन 7 हजार रुपये किंमतीत उतरवण्याचा सुद्धा कंपनीकडून विचार केला जात आहे. रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांनी रिअलमी 5जी समिट मध्ये असे म्हटले की, कंपनी 5जी स्मार्टफोनच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर काम करत आहे. 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासह भारत आणि जगातील विविध ठिकाणी लोकेशनवर रिसर्च सेंटर सुरु करणार आहे.

माधव सेठ यांनी पुढे असे म्हटले की, पुढील 3-4 वर्षात रिअमलमी कंपनी 5जी स्मार्टफोनच्या दुसऱ्या जनरेशन 2.0 मध्ये उतरणार आहे. त्यामुळे यापूर्वीची जनरेशन ही दुसऱ्या जनरेशनमध्ये 5 जी स्माार्टफोन अधिपेक्षा अधिक स्वस्त होणार आहेत. त्यांनी म्हटले की, लवकरच 5जी स्मार्टफोन मिड रेंज आणि एन्ट्री लेव्हल सेगमेंट मध्ये उपलब्ध असणार आहे. तर 2020 मध्ये रिअलमीच्या 5जी प्रोडक्ट्सची संख्या 20 टक्क्यांनी वाढून 40 टक्के झाली. तर 2022 मध्ये हीच आकडेवारी 70 टक्के होण्याची अपेक्षा आहे. रिअलमीचे हे सर्व प्रोडक्ट्स जगभरातील मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहेत.(Google ने मागितली जाहीर माफी; भारतामधील सर्वात कुरूप भाषा म्हणून केला होता 'कन्नडा'चा उल्लेख)

Qualcomm India & SAARC  चे प्रेसिडेंट Rajen Vagadia यांनी असे म्हटले की, भारतासारख्या देशात 5 जी स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी कंपन्या लवकरात लवकर 5 जी नेटवर्क लॉन्च करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतात 5 जी कॉमर्शिअयल उपलब्ध आहे. भारतातील बहुतांश ठिकाणी 5 जी डिवाइस आधीपासूनच उपलब्ध आहे. याच्यामुळे ग्राहकांना माहिती आहे की, उत्तम 5 जी गेमिंग आणि कॅमेराचा अनुभव मिलणार आहे.