आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असा दिवस आहे. आज 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. म्हणून 1 मे हा दिवस महाराष्ट्रात 60 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा केला जात आहे. हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. मात्र यंदा जगभरात कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घरात राहूनच नागरिकांनी हा दिवस साजरा करावा अशे सांगण्यात येत आहे. या महान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी खास मराठी भाषेत ट्विटरवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी आपल्या यांनी आपल्या ट्विट मध्ये 'जय महाराष्ट्र' चा नारा देत महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Happy Maharashtra Day 2020 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Quotes, Hike Stickers च्या माध्यमातून शेअर करून अभिमान वाढवा 'मी मराठी' असल्याचा!
पाहा ट्विट:
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020
या ट्विटमध्ये देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
1 मे 1960 दिवशी ब्रिटिश राजमधील ‘बॉम्बे’ प्रेसिडन्सी म्हणजे आजचा गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश यांची भाषावार प्रांतरचनेनुसार दोन विविध आणि स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी झाली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे.