अहमदाबाद ते गॅटविक विमानाचा 12 जून दिवशी अपघात झाल्यानंतर आता सारीच विमानं विशेष काळजी घेऊन चालवली जात आहे. आज त्याच रूट वर जाणारे फ्लाइट AI159 रद्द करण्यात आली आहे. सुरूवातीला रिपोर्ट्स मध्ये पुन्हा तांत्रिक दोषामुळे विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते मात्र आता एअर इंडियाने दिलेल्या माहितीमध्ये विमान उपलब्ध नव्हते, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि अतिरिक्त खबरदारीच्या तपासणीमुळे विमान नेहमीपेक्षा जास्त वेळ थांबल्याने रद्द झाल्याचं सांगण्यात आले आहे. "आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आम्ही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत आहोत आणि प्रवाशांनी रद्द केल्यास किंवा मोफत वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेड देखील देत आहोत. परिणामी, 17 जून रोजी लंडन गॅटविक ते अमृतसर ही फ्लाइट AI170 रद्द करण्यात आली आहे." असेही त्यांनी सांगितलं आहे. London-Bound Air India Flight Cancelled: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 159 विमानातही तांत्रिक बिघाड; उड्डाण रद्द .
अहमदाबाद ते गॅटविक विमान रद्द वरील एअर इंडियाची माहिती
Air India says, "Flight AI159 from Ahmedabad to Gatwick has been cancelled today due to the unavailability of the aircraft, resulting from airspace restrictions and additional precautionary checks, leading to longer than usual turnaround of aircraft, and not due to any technical… https://t.co/1gKv4R1kmk
— ANI (@ANI) June 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)