India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला. यासह, इंग्लंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2nd Test. England won the toss and elected to bowl. https://t.co/hCuTMv4DPv #ENGvIND #2ndTest
— BCCI (@BCCI) July 2, 2025
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारताची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)