India National Cricket Team vs England National Cricket Team: बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर 2 जुलैपासून इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Test Match) शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने (Team India) पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा करत मोठी धावसंख्या नोंदवली. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 407 धावा केल्या. यासह भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली. चौथ्या दिवशी टीम इंडियाने आपला दुसरा डाव 427 धावांवर घोषित केला. आणि इंग्लंडसमोर 608 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड तंबूत परतला आहे. इंग्लंड संघाची धावसंख्या 111/5 आहे.
L. B. W!
Akash Deep and #TeamIndia are chipping away! 👏 👏
England 5 down as Harry Brook departs.
Updates ▶️ https://t.co/Oxhg97fwM7#ENGvIND pic.twitter.com/odi5iRArtC
— BCCI (@BCCI) July 6, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)