दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी कोर्टात क्लिन चीट दिल्यानंतर आज संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना नितेश राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह ज्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केले त्यांनी त्यांची माफी मागावी असं संजय राऊत म्हणाले आहे. या प्रकरणात विनाकारण पक्षाच्या युवा नेत्यावर आरोप झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना (यूबीटी) पक्षासह युवा नेत्याची माफीची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी बॉम्बे हाय कोर्टामध्ये अ‍ॅफिडेव्हिट सादर करताना दिशाचा मृत्यू ही आत्महत्या आहे. यामध्ये कोणताही बलात्कार, खूनाचा प्रकार आढळून येत नसल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)