Disha Patani Birthday: दिशा पटानी ने आपल्या वाढदिवसानिमित्त आपला बिकिनीतील Hot फोटोज शेअर करुन चाहत्यांना दिले छान सरप्राईज
Disha Patani (Photo Credits: Instagram)

Disha Patani 29th Birthday: बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिचा आज 29 वा वाढदिवस... तिच्या वाढदिवसानिमित्त आज तिचे असंख्य चाहते तिला सोशल मिडियाद्वारे खूप सा-या शुभेच्छा पाठवत आहेत. फिटनेस फ्रिक असलेली दिशा पटानी सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. तिचे वर्कआऊटचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्याचबरोबर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस अदा चाहत्यांना अक्षरश: घायाळ करतात. आज आपल्या वाढदिवसानिमित्त दिशा पटानी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक बिकिनीतील हॉट फोटो शेअर करुन चाहत्यांना छान सरप्राईज दिले आहे.

या फोटोमध्ये दिशा पटानी समुद्रकिना-यावर एक हॉट बिकिनीत बसली आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून या फोटोला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- Disha Patani चा Back Flip व्हिडिओ व्हायरल; स्टंटबाजीसाठी चाहत्यांकडून कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा पटानी हिचा जन्म 13 जून 1992 मध्ये उत्तर प्रदेशच्या बरेली येथे झाला. दिशाला लहानपणापासूनच ग्लॅमरस जगाचे आकर्षण होते. यासाठी तिने आपले शिक्षण देखील अर्ध्यावर सोडले. दिशाने आपल्या करियरची सुरुवात 2015 मध्ये तेलुगू चित्रपट 'लोफर' ने केली. त्यांनतर तिला सुशांत सिंह राजपूत सह 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण कऱण्याची संधी मिळाली.

दिशाने आतापर्यंत बागी 2, बागी 3, मलंग, भारत आणि राधे या चित्रपटांत काम केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई आहे.