Disha Patani (Photo Credits: Instagram)

Disha Patani Stunt Video: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिचा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' अलिकडेच रिलीज झाला. सिनेमात दिशाचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. दिशा सोशल मीडियावर देखील प्रचंड अॅक्टीव्ह असते. तिच्या पोस्ट चाहत्यांना खिळवून ठेवतात. आजही दिशाने शेअर केलेला व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओतून तिच्या फिटनेसचेही दर्शन घडते. (Ek Villain Returns: एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटाच्या शुटींगसाठी अभिनेत्री दिशा पटानी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात; मनसेने घेतला आक्षेप)

दिशा पटानीने आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती बॅक फ्लिप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, काश हे बटरप्रमाणे फिल होत असते. या व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबतच दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यांनी देखील यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

या व्हिडिओत दिशाने ब्लॅक शॉर्ट्स आणि व्हाईट टी-शर्ट घातले आहे. अत्यंत आत्मविश्वासाने दिशाने ब्लॅक फ्लिप केले आहे. स्टाईल, फिटनेस, स्टँट्स यात दिशा अगदी अव्वल आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या व्हिडिओला चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिशा पटानी लवकरच 'एक विलन रिटर्न्स' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात तिच्यासोबत जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया झळकणार आहेत. मोहित सुरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.