Ek Villain Returns: एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटाच्या शुटींगसाठी अभिनेत्री दिशा पटानी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात; मनसेने घेतला आक्षेप
MNS Flag (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांच्या एक व्हिलन रिटर्न्स (Ek Villain Returns) या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या शुटींगसाठी हे दोघेही शुक्रवारी (5 मार्च) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे मतदारसंघ वरळी (Worli) कोळीवाड्यात आले होते. मात्र, यावर मनसे नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाच्या शुटिंगवेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असून सर्व कलाकारांनी मास्क न घातल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात वारंवार स्वच्छ धुण्याचे सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय, मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे मात्र, या घटनेनंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वरळी कोळीवाड्यात शुक्रवारी (5 मार्च) रात्री उशीरा एका चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. यावेळी जॉन अब्राहम आणि दिशा पटानी त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र, एकाही कलाकाराने तोंडावर मास्क घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नव्हते, असा दावा संतोष धुरी यांनी केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. हे देखील वाचा- Raj Thackeray Letter to CM Uddhav Thackeray: राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र म्हणाले 'Nanar Refinery Project बाबत सामंज्यस्याची भूमिका घ्यावी'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरळी काही दिवसांपूर्वी नाईट क्लबमध्ये तुफान गर्दी जमली होती. दरम्यान, कोरोना नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभेत यावरुन बराच गदारोळही झाला होता. या सगळ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या नाईट क्लबवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वरळीत दिशा पटानीच्या अगामी चित्रपटाचे शुटींग सुरु असताना राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे मनसेने उजेडाण आणून दिले आहे. यामुळे यासंदर्भात आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.