Shrikant Shinde on Deputy CM Post: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांनी सोडलं मौन; पहिल्या प्रतिक्रीयेतच सर्व गोष्टींचा केला उलगडा

श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडलं आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर भाष्य केलं.

Shrikant Shinde on Deputy CM Post: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांनी सोडलं मौन; पहिल्या प्रतिक्रीयेतच सर्व गोष्टींचा केला उलगडा
Photo Credit- X

Shrikant Shinde on Deputy CM Post: राज्यात महायुतीच (Mahayuti)सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खात्यांवर अनेक मोठ्या बैठकी होत आहेत. आशातच श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या स्पष्टीकरणामुळे आता सर्व चर्चांना उत्तर मिळाले आहे. श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री(Maharashtra Deputy CM) होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडलं आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर भाष्य केलं.(Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसच बनणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली माहिती)

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.

माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).