HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली
वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शासनाने 1 एप्रिल, 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. ही वेळ 15 ऑगस्ट 2025 पूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही.
यानंतर देखील एचएसआरपी पाटी बसवलेली नसलेली वाहने वायुवेग पथकांच्या तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी मुदतीच्या आत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. (हेही वाचा: Rapido Bike Taxi चे ग्राहक असल्याचं भासवत मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली बाईक टॅक्सी सेवेची पोलखोल; अनधिकृत सेवांवर थेट कारवाई)
HSRP Deadline Extends to August 15:
राज्य शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (#एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम #मुदतवाढ देण्यात आल्याचे, सह… pic.twitter.com/kc1Z7RK911
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 3, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2025 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

