Pratap Sarnaik | X @PratapSarnaik

महाराष्ट्र परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुंबई मध्ये स्वतः रॅपिडो ग्राहक असल्याचं भासवत अवैध पणे सुरू असलेल्या सुविधेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मुंबई मध्ये सध्या रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा वैध सेवा नाही अजूनही सरकार कडून त्याच्यामध्ये कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणं बाकी आहे. रॅपिडो ही बाईक टॅक्सी (Rapido Bike Taxi) सेवा देते. पण त्याला कायद्याने अजूनही मंजुरी दिलेली नाही. सरनाईकांनी अधिकार्‍यांसह रॅपिडो सेवा मंत्रालय ते दादर साठी बूक केली होती. यासाठी 195 रूपये आकारले होते. दक्षिण मुंबई मध्ये विधिमंडळ परिसरातच त्यांनी ग्राहक असल्याचं भासवलं. बाईक चालकाला ही प्रताप सरनाईकांची ओळख पटली नाही. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना या चालकाविरूद्ध गुन्हा नका नोंदवू तो केवळ कर्मचारी आहे कंपनी विरूद्ध अ‍ॅक्शन घेण्याचे निर्देश दिले.

प्रताप सरनाईकांच्या रॅपिडो बाईक टॅक्सी चालकासोबतचा व्हिडिओ सोशल मीडीयातून समोर आला आहे. यामध्ये प्रताप सरनाईकांनी स्वतः त्याला घरी जाण्यासाठी 500 रूपये दिले. 1 एप्रिल दिवशी राज्य मंत्रिमंडळाने इलेक्ट्रिक-बाईक टॅक्सी धोरणाचा मसुदा जारी केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की सरकारच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या ई-बाईकच बाईक टॅक्सी म्हणून वापरता येतील. जुलैमध्ये मंजूर झाल्यानंतर हे धोरण अंमलात येणार होते, परंतु आतापर्यंत, योग्य नियमांच्या अभावामुळे, राज्यात सर्व बाईक टॅक्सी बेकायदेशीर आहेत.

प्रताप सरकनाईकांनी पकडली मुंबईत बेकायदेशीर बाईक टॅक्सी

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात महाराष्ट्र परिवहन आयुक्त कार्यालयाने रॅपिडो आणि उबर कंपन्यांविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सी चालवल्याच्या आरोपाखाली प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला.