India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर 2 जुलैपासून सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात 151 षटकांत सर्व गडी गमावून 587 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 269 धावांची शानदार खेळी साकारली. इंग्लंडसाठी शोएब बशीरने तीन बळी घेतले, तर ख्रिस वोक्स आणि जो टंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी आलेला इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मोहम्मद सिराजने भारताला दोन विकेट मिळवून दिल्या आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. इंग्लंडचा स्कोर 108/5
Ben Stokes has been dismissed for a golden duck for the first time in his Test career 🤯 pic.twitter.com/icT4nRZL04
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)