ग्रुप स्टेजमधील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहते या शानदार सामन्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत, कारण हे दोन्ही संघ 10 सप्टेंबर रोजी सुपर-4 मध्ये आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा एकदा श्रीलंकेतील संघात सामील झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बुमराह शुक्रवारी संध्याकाळी आर.प्रेमदासा स्टेडियमवर सराव सत्रासाठी संघात सामील झाला. खराब हवामानाच्या शक्यतेमुळे, भारतीय संघाला गुरुवारी जसे इनडोअर सराव सत्र आयोजित करावे लागले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)