Penguine Games Web Series: 'पेग्विंन गेम सीरिज' च्या माध्यमातून मनसे दाखवणार वरळीतील नागरिकांच्या खऱ्या समस्या
MNS New Flag (Photo Credits: Twitter)

MNS Launched Penguine Games:  शिवसेनेकडून वरळी A+ उपक्रम राबवला जात असून त्यानुसार स्ट्रिट आर्ट, एलईडी सिग्नल्स आणि रस्त्यांचे नुतनीकरण केले जात आहे. या उलट आता मनसेकडून वरळीतील नागरिकांच्या खऱ्या समस्या दाखवून देण्यासाठी 'पेग्विंग गेम सीरिज' लॉन्च करण्यात आली आहे. तर पहिल्याच एपिसोड हा फेसबुक वर लाइव्ह करण्यात आला. त्यामध्ये प्रेम नगर येथील अत्यंत वाईट पद्धतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा आणि निर्जंतुकीकरणाची समस्या दाखवण्यात आल्या. यावरुन असे दिसून येते की, स्थानिक आमदार आणि तेथील कार्यरत पक्षाकडून वरळीतील खऱ्या समस्या विसरले असून फक्त सुशोभिकरणाच्या पाठी लागले आहेत. पण येथे तर सामान्यांना मुलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मनसेचे संतोष धुरी यांनी म्हटले आहे.

धुरी यांनी पुढे असे ही म्हटले की, पेग्विंग गेम सीरिज मधील पुढील एपिसोड हा प्रत्येक पंधरा दिवसानंतर दाखवला जाईल. त्याचसोबत दोन आठवड्यांसाठी नवा एपिसोड ही असणार आहे. हे एपिसोड सोशल मीडियात दाखवले जाणार आहेत. प्रेम नगर येथील नागरिकांकडून यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला असून टॉयलेट्सची झालेली दुर्दशेबद्दल ही त्यांनी सांगितले. सार्वजनिक टॉयलेट्सला दरवाजेच नाहीत, पाण्याचा पुरवठा नाही अशी समस्या असून त्याबद्दल तक्रार करुन आता नागरिक कंटाळले असल्याचे ही धुरी यांनी सांगितले.(BMC Election 2021: उद्धव ठाकरे आपडा! बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज; मुंबई येथे आज गुजराती मेळाव्याचे आयोजन)

तर 2019 मध्ये झालेल्या निवडणूकीत वरळी येथून आदित्य ठाकरे यांना आमदारकीचे पद आणि तेथील शिवसेनेतील सात नगरसेवक यांचा सुद्धा विजय झाला. 2022 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूकीत मनसे सुद्धा आता सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(Mumbai Commissioner: मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त आवश्यक; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी)

महापालिकेने नुकत्याच वरळी सी फेसच्या येथे शहरात प्रथमच एलईडी ट्राफिक सिग्नल्स लावले. त्यामुळे ज्या नुसार ट्राफिक सिग्नलचा कलर होईल त्याच रंगाचे ते ट्राफिक पोल दिसून येणार आहेत. तसेच गेल्या काही आठवड्याच आदित्य ठाकरे यांनी वरळीत विविध उपक्रमांचे उद्घाटन ही केले आहे. या सर्व सुशोभिकरणाच्या गोष्टी झाल्याच पण स्थानिकांच्या खऱ्या समस्या या अधिकच वाईट होत चालल्या आहेत. त्यामुळेच आता आमच्या सीरिज या सर्व गोष्टी उघडकीस आणणार असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे.