Loksabha Election 2024: मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जामा मशिदीचे विश्वस्त शोएब खतीब यांनी बहुजन समाज पक्षाचे (BSP) उमेदवार म्हणून मुंबई दक्षिण जागेसाठी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खतीब म्हणाले की, त्यांनी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची, बसपची ऑफर स्वीकारली आहे. राज्यातील दोन प्रमुख राजकीय युती- एनडीए आणि इंडिया आघाडीने राज्यातील 48 पैकी एकाही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही, म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे खतीब यांनी सांगितले.

खतीब म्हणाले की, ‘आमच्या ट्रस्टची घटना विश्वस्त सार्वजनिक निवडणूक लढवू शकत नाही असे म्हणत नाही. आपल्या देशाच्या घटनेतील कोणतीही गोष्ट मला निवडणूक लढवण्यापासून रोखत नाही. आपल्या देशाच्या घटनेत न्यायाधीश आणि सरकारी अधिकारी निवडणूक लढवू शकत नाहीत असा नियम आहे.’ याबाबत पत्रकार सईद हमीद म्हणतात, ‘मुस्लिम समाजातील काही सदस्यांना असे वाटते की मशिदी, दर्गा, धार्मिक शाळा आणि शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त आणि इतर अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांनी संस्थांमधून राजीनामा द्यावा. अशा लोकांचा राजकारणात प्रवेश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, समुदाय संस्थांच्या हितावर परिणाम करू शकतो.’ (हेही वाचा: Loksabha Election 2024: मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या खास सुविधा; केंद्रावर उपलब्ध असणार पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे, शेड, बेंच, इंटरनेट कनेक्टिव्हिटी)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)