लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ५३५२ कायमस्वरूपी तर २०३२ तात्पुरती अशी एकूण ७३८४ मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था, महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि मोबाईल टॉयलेटची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. उन्हाची अधिक  तीव्रता पाहता यावेळी विशेष म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर  ओ.आर.एस. उपलब्ध असणार आहे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग असेल त्या ठिकाणी तेथील मतदारांना बसण्यासाठी बेंच व चेअर, शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच वीजपुरवठा, इंटरनेट, फोन कनेक्टिव्हिटी उपलब्ध असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. (हेही वाचा: Nana Patole On Ram Temple: INDIA आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण करू; नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)