दिग्दर्शक Sanjay Jadhav कडून 'येरे येरे पैसा ३' ची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या दोन्ही सिनेमांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आता तिसर्या भागाच्या कहाणी बद्दल सार्यांच्याच मनात उत्सुकता आहे. आयुष्यात पैसा कमावण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्यामधून निर्माण होणारा गोंधळ या वर येरे येरे पैसा च्या दोन्ही भागांची कथा आधारित होती. कॉमेडी अंदाजातील या सिनेमाच्या तिसर्या भागात काय असेल याची आता उत्सुकता आहे. 1 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या भागात आनंंद इंगळे, तेजस्विनी पंडीत, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार आदी कलाकार दिसणार आहेत.
येरे येरे पैसा 3 प्रोमो
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)