BMC Officials Clash With Gauahar Khan’s Team: नियमांचे उल्लघंन केल्यामुळे अभिनेत्री गौहर खान वादाच्या भोवऱ्यात, बीएमसीच्या अधिकाऱ्यासोबत बाचाबाची
BMC Officials Clash With Gauahar Khan’s Team, PC TWITTER

BMC Officials Clash With Gauahar Khan’s Team: टीव्ही अभिनेत्री गौहर खान नेहमी चर्चेत असते. नुकतचं तीने पती झैद दरबार सोबत आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. त्यांचा मुलगा जेहान १ वर्षाचा झाल्याने मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात वाढदिवसाच्या डेकोरेशनमुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही नियमांचे पालन न केल्यामुळे गौहर खान आणि झैद त्यांना अडचणींना सामना करावा लागला आहे. (हेही वाचा-Vikrant Massey चा कॅब ड्रायव्हर सोबत 'तो' भांडणाचा व्हिडिओ Scripted; inDrive सोबत प्रोमोशनल स्टंट )

मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या डेकोरेशन बाबत त्यांनी नियमांचे उल्लघंन केले. याबाबत बीएमसीने वारंवार सुचना देऊन ही त्यांनी टाळाटाळ केले. त्यामुळे बीएमसी अधिकाऱ्यांने डेकोरेशमध्ये लावण्यात आलेले हॉटेल बाहेरचे गेट हटवण्याची मागणी केली.  परंतू ते हटवले नाही त्यामुळे अभिनेत्रीच्या टीममध्ये आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा एक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत बीएमसीचे अधिकारी ट्रक घेऊन येत आहे. संपुर्ण गेट तोडताना दिसत आहे. सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना गेट हटवण्यास सांगितले होते परंतु त्यांनी नकार दिल्याने अधिकाराने स्वत:च्या हाताने गेट तोडून ट्रकमध्ये ठेवला अशी माहिती मिळाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.