संयुक्त राष्ट्र महासभेने शुक्रवारी पॅलेस्टाईनला नवीन 'अधिकार आणि विशेषाधिकार' देण्यासाठी मोठ्या फरकाने मतदान केले आणि युनायटेड नेशन्सचा 194 वा सदस्य होण्याच्या विनंतीवर अनुकूलपणे पुनर्विचार करण्यासाठी सुरक्षा परिषदेला आवाहन करण्यात आले. हा ठराव 143 देशांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आला, तर 9 देशांनी विरोध केला आणि 25 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. याच्या विरोधात मतदान करणाऱ्या नऊ देशांमध्ये इस्त्रायलसह अमेरिकाही होती.

भारताने या ठरावाला पॅलेस्टाईनच्या बाजूने मत दिले. भारताने नेहमीच पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे आणि द्विराज्य समाधानाचा पुरस्कार केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाद केवळ संवादातूनच सोडवला जाऊ शकतो आणि दोन्ही देशांना शांततापूर्ण सहजीवनाचा अधिकार आहे, असे भारताचे मत आहे. (हेही वाचा: TikTok Sues US Government: टिकटॉकने अमेरिकन सरकारविरुद्ध दाखल केला खटला; सक्तीची विक्री किंवा बंदीचा कडाडून विरोध, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)