Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico: रफाहमधील हल्ल्यांविरोधात तीव्र निदर्शने; संतप्त जमावाने मेक्सिकोतील इस्रायली दूतावासाला लावली आग (Watch Video)
पॅलेस्टाईन समर्थक (नरसंहार विरोधी) निदर्शकांनी मेक्सिकोमधील इस्रायली दूतावास पेटवला. मंगळवारी मेक्सिको सिटीमधील इस्रायली दूतावासाच्या बाहेर सुमारे 200 लोक ‘रफाहसाठी त्वरित कारवाई’ निदर्शनात सामील झाले.
Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico: गाझामधील रफाह येथे इस्रायली हल्ल्यांविरोधातील निदर्शने तीव्र होत आहेत. जगभरात अनेक लोक इस्रायलच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. अशात आता संतप्त जमावाने बुधवारी मेक्सिको सिटीमधील इस्रायली दूतावासाला आग लावली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पॅलेस्टाईन समर्थक (नरसंहार विरोधी) निदर्शकांनी मेक्सिकोमधील इस्रायली दूतावास पेटवला. मंगळवारी मेक्सिको सिटीमधील इस्रायली दूतावासाच्या बाहेर सुमारे 200 लोक ‘रफाहसाठी त्वरित कारवाई’ निदर्शनात सामील झाले. त्यावेळी त्यांनी दूतावास पेटवून दिला. मंगळवारी इस्त्रायली गोळीबार आणि हवाई हल्ले यांनी रफाहच्या पश्चिमेकडील अल-मवासी येथील निर्वासित छावणीला लक्ष्य केले, परिणामी अनेक लोकांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान रोहित शर्माची पत्नी Ritika Sajdeh ने शेअर केली 'All Eyes on Rafah' मोहिमेला पाठींबा दर्शवणारी इंस्टाग्राम स्टोरी; 'खाते हॅक झाले का?' चाहत्यांचा प्रश्न)
पहा व्हिडिओ-
BREAKING🚨 Pro-Palestine (anti-genocide) protesters have lit up the Israeli Embassy in Mexico…🇲🇽
This was in response to the IDF targeting a refugee camp in Rafah…🇵🇸 pic.twitter.com/vEHIbOWAUl
— Pelham (@Resist_05) May 29, 2024
Mexicans set the Israeli embassy on fire!
Mexico stands with Palestine 🇵🇸 🙌🏻🙌🏻
— JonnyUtd (@JonnyFX1) May 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2024 06:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

