TikTok Sues US Government: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) आणि त्याची मूळ कंपनी ByteDance यांनी मंगळवारी यूएस फेडरल सरकारविरुद्ध खटला दाखल केला. यूएसमधील एका नव्या कायद्यानुसार, कंपनीला त्यांचे सोशल मीडिया ॲप विकण्यास भाग पाडले जाईल किंवा त्यांना युनायटेड स्टेट्समध्ये बंदीला सामोरे जावे लागेल. आता याच कायद्याला ByteDance ने न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यावर गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी स्वाक्षरी केली होती. या खटल्यामुळे यूएसमधील टिकटॉकच्या भविष्याबाबत दीर्घ कायदेशीर लढाई होऊ शकते.

लहान व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या टिकटॉक या प्लॅटफॉर्मने अमेरिकन सरकारने मंजूर केलेला हा कायदा असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे की, टिकटॉकची मूळ कंपनी ByteDance ला नऊ महिन्यांच्या आत आपला प्लॅटफॉर्म विकावा लागेल. जात त्यांचे विक्रीसाठी आधीच कोणते प्रयत्न सुरू असल्यास, कंपनीला करार पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तीन महिने मिळतील. परंतु ByteDance ने म्हटले आहे की, त्यांची टिकटॉक विकण्याची कोणतीही योजना नाही, मात्र विक्री करण्याचा विचार असला तरी त्याला चीन सरकारची मान्यता घ्यावी लागेल. प्लॅटफॉर्मच्या सक्तीच्या विक्रीला चीनने यापूर्वी विरोध केला आहे. (हेही वाचा: Tesla Layoffs: टेस्ला टाळेबंदी, कंपनीच्या पुनर्रचनेत हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)