Mexican Tiktoker Shot Dead:  टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना एका मेक्सिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची दुर्दैवी गोळीबारात हत्या करण्यात आली. 23 वर्षीय व्हॅलेरिया मार्केझ हिने टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर जवळजवळ 2,00,000 फॉलोअर्ससह ऑनलाइन लोकप्रियता मिळवली होती. तिचा अलिकडचा लाईव्ह तिचा शेवटचा लाईव्ह ठरला. तीच्यावर तिनदा गोळीबाग झाला. मार्केझ तिच्या ब्युटी सलून, ब्लॉसम द ब्युटी लाउंजमधून स्वतःचे चित्रीकरण करत असताना ही घटना घडली.

डोक्यात आणि छातीवर गोळी

कॅमेर्यात कैद झालेल्या व्हिडीयोत ती अचानक एकदा नव्हे तर तीनदा गोळी झाडल्याचे दिसून येते. गोळीच्या जोरात आघातामूळे ती मागे ढकलली गेल्याचे दिसते. पोलिसांनी तिला घटनास्थळी मृत घोषित केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)