Russia Bus Accident: रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलावरून खाली नदीत पडली आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावरून धावणारी बस अचानक वळून, पुलावरील रेलिंग तोडून नदीत कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने, बस अनेक गाड्यांना धडकून पुलावरून मोयका नदीत पडली. माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 20 लोक होते. या बसच्या चालकाला रशियाच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी अटक केली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रशियाच्या गृह मंत्रालयाने सांगितले.

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)