Chhatrapati Sambhajinagar Shocker: वैजापूर तालुक्यात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; गुन्हा दाखल

शुक्रवारी रात्री त्या सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमातील एका खोलीत झोपल्या असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे डोके दगडाने ठेचले आणि आश्रमातील मंदिरातून दोन दानपेट्या चोरून नेल्या.

Chhatrapati Sambhajinagar Shocker: वैजापूर तालुक्यात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; गुन्हा दाखल
Murder

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमात कीर्तनकार संगीता पवार या महिलेची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री आश्रमात घडली. संगीता या अविवाहित होत्या आणि त्यांनी संन्यास घेतला होता. त्या जवळच्या भागात कीर्तन करत असत. शुक्रवारी रात्री त्या सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमातील एका खोलीत झोपल्या असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे डोके दगडाने ठेचले आणि आश्रमातील मंदिरातून दोन दानपेट्या चोरून नेल्या. शनिवारी सकाळी पुजारी शिवाजी चौधरी यांना मंदिराचा दरवाजा आणि कुलूप तुटलेले आढळले. त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांनतर त्यांनी तातडीने ग्रामस्थांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. कृष्णा अण्णासाहेब पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वीरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात खुन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Sangli Murder Case: सांगलीत प्रेमप्रकरणातून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या; 2 आरोपींना अटक)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2025 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).