Woman Jumps Off Building in Jogeshwari East: बॉयफ्रेंड आणि सोशल मीडीयात ओळख झालेल्या तरूणाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून 24 वर्षीय मुलीची इमारतीच्या गच्ची वरून उडी मारत आत्महत्या
Death PC PIXABAY

मुंबई मध्ये एका 24 वर्षीय तरूणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. या तरूणीला तिचा बॉयफ्रेंड आणि सोशल मीडीया वर ओळख झालेल्या एका व्यक्तीकडून मानसिक त्रास दिला जात होता त्यामधून तिने हे टोकाचं पाऊल उचलं असल्याचं सांगितलं जात आहे. ही मुलगी पदवीधर होती खाजगी शिकवण्या घेत होती. 3 मे दिवशी तिने जोगेश्वरी पूर्व भागात इमारतीच्या गच्ची वरून उडी मारत जीवन संपवलं. मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. तिच्या मृत्यूला बॉयफ्रेंड सूरज आचार्य आणि ऑनलाईन मित्र करण रावल असल्याचं म्हटलं आहे. असे Free Press Journal चं वृत्त सांगतं.

सध्या करण रावलला पोलिसांनी अटक केली आहे. 10 मे पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर बॉयफ्रेंड आचार्यची लवकरच पोलिस चौकशी करणार आहेत. पीडीतेने आचार्य सोबतच्या संबंधांबद्दल तिच्या पालकांना ऑक्टोबर 2023 मध्ये सांगितले होते आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा तिचा मानस होता. मात्र तिची रावल सोबतची मैत्री त्याला खटकत होती. रावलला टाळण्याचा ती प्रयत्न करत होती पण तरीही तो तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता. तिला शारीरिक आणि टोमण्यांनी त्रास देत होता. Pune Crime: पुण्यात संपत्तीच्या वादातून महिलेची आत्महत्या; नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल .

रावलने तिच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली आणि बॉयफ्रेंड आचार्यने तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. वाढलेल्या तणावामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तिला तात्काळ कुलकर्णी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या मेघवाडी पोलिसांनी तिच्या वडिलांच्या जबाबावरून आचार्य आणि रावल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.