Mumbai Water Cut Update: कुलाबा भागामध्ये 11 मे दिवशी पाईपलाईन दुरूस्तीच्या कामासाठी 8 तास पाणी पुरवठा राहणार बंद
Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

बीएमसी (BMC) कडून मुंबई मधील 'ए' वॉर्ड (Ward A) मधील पाणी पुरवठा 11 मे दिवशी 8 तास बंद ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जीवन बीमा मार्ग वरील पाणी लीकेजच्या समस्येसाठी पाईपलाईन दुरूस्तीचं काम पालिकेने हाती घेतलं आहे. त्यासाठी काही भागात हा पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

1,200 मीटर व्यासाच्या जलवाहिनीची मुख्य गळती जीवन विमा मार्गावरील मंत्रालय इमारतीजवळ सुरू असलेल्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामामुळे झाली होती, असे पालिकेने म्हटले आहे. गळती दूर करण्यासाठी कुलाबा, कोळीवाडा आणि नेव्ही नगर भागात दुपारी 3.30 ते 11.30 या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कुलाबा मध्ये 8 तास पाणी बंद

वाहतूक विभागाची परवानगी घेतल्यानंतर शनिवारी सकाळी नऊ वाजता या जागेच्या दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे त्यामुळे कुलाबा, कोळीवाडा, नवले परिसरात आठ तास पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, क्रॉस मैदान बोगद्यामधून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपमधून ए वॉर्डला पाणीपुरवठा करताना त्याचा दाब कमी झाला आणि ही समस्या समोर आली.