PM Narendra Modi यांनी विलिनीकरणावरून Sharad Pawar यांना भाजपामध्ये येण्याच्या ऑफरला पहा काय दिले 'जशास तसे उत्तर'
Pic Credit:- PM Modi & Sharad Pawar Facebook

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकींच्या अंतिम टप्प्यातील मतदानाचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी- विरोधक एकमेकांवर टोकाची टीका, हल्ला, प्रतिहल्ले करत आहेत. अशात आज नंदूरबार मध्ये प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचे धनी केले आहे. यावेळेस 'आता शरद पवार हताश झाल्याने विलीनीकरणाची भाषा करत आहेत. शरद पवारांनी विलीनीकरणा पेक्षा आमच्यासोबत यावं' असं म्हणत ऑफर दिली. त्यावर शरद पवारांनीही मोदींना जशास तसे उत्तर दिले आहे.

'अलिकडची पंतप्रधान नरेंद्र मोदींची सगळी भाषणं समाजात चूकीचा विश्वास निर्माण व्हायला पोषक आणि देशाच्या दृष्टीने घातक आहेत. जे देशाच्या हिताचे नाहीत ते आमचे सहकारी असणार नाहीत.' असं म्हणत मोदींचा भाजपामध्ये येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात यासंदर्भात काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर सध्या राज्यात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. PM Modi vs INDI Alliance: नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पुन्हा हल्ला; 'फेक शिवसेना मला जीवंत गाडण्याची भाषा करते' 

संजय निरूपमांचा दावा

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव या आधी देखील आला होता, पण सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा करा अशी अट शरद पवारांनी ठेवली होती असा वादा निरुपम यांनी केला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवार हे मूळचे कॉंग्रेसच्या विचारधारेतून आलेले नेते, राजकारणी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात पूलोद सरकारचा देखील प्रयोग केला होता. 1999 मध्ये शरद पवारांनी कॉंग्रेस मधून वेगळे होत एनसीपी पक्षाची स्थापना केली. आता त्याला राष्ट्रीय पक्ष देखील केले. मात्र वर्षभरापूर्वी शिवसेना पाठोपाठ एनसीपी मध्येही उभी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली 1 खासदार आणि मोठ्या संख्येने आमदार भाजपाला जाऊन मिळाले आहेत.

सध्या शरद पवार एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर सुप्रिया सुळे यांना  कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.