Google Wallet App Launch: भारतात अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी 'गुगल वॉलेट' ॲप लॉन्च, 20 ब्रँड्सशी करार; नेमका उपयोग काय?
Photo Credit - X

Google Wallet App Launch: गुगलने लोकांचं जगनं सोपं केलं आहे. कंपनीने आता नुकतंच अँड्रॉईड वापरकर्त्यांना 'गुगल वॉलेट' (Google Wallet) नावाचं नवं ॲप लॉन्च केलं आहे. ज्यात अँड्रॉईड(Android)वापरकर्ते त्यांचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट सुरक्षित रित्या ठेवू शकतात. यात वापरकर्ते हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड ठेवू शकतात. ज्यात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड यांचा समावेश होतो. हे एक डिजिटल वॉलेट असून अँड्रॉईड वापरकर्त्यांना ते वापरता येणार आहे. (हेही वाचा:Zomato Weather Union: झोमॅटो CEO दीपिंदर गोयल यांनी भारतातील पहिल्या क्राउड-सपोर्टेड वेदर इन्फ्रास्ट्रक्चरचे अनावरण केले)

त्यामुळे मल्टी पर्पजसाठी हे ॲप लोकांच्या उपयोगी नक्की येईल यात काही शंका नाही. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड, याशिवाय, या वॉलेटमध्ये चित्रपटाचे टिकट, बोर्डिंग पास, आयडी कार्ड साठवून ठेवू शकतो. हे ॲप गुगल पे सारखे काम करेल असा संभ्रम अनेकांना असेल तर असं काही नाही. या ॲपचा गुगल पे वर कोणताही परिणाम होणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल पे हे ॲप बंद होणार नाही. गुगल वॉलेट हे नॉन पेमेंट ॲप असणार आहे. त्यामुळे गुगल पे वर त्याचा काहीही परिणाम पडणार नाही, असे गुगलने सांगितले आहे.

भारतात लॉन्च होण्यापूर्वी गुगलने एकूण 20 ब्रँड्सशी याबाबत करार केला आहे. यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, एअर इंडिया, इंडिगो, फ्लिपकार्ट, पाईन लॅब्स, कोच्ची मेट्रो या ब्रँड्सचा समावेश आहे. गुगल वॉलेटमुळे चित्रपट पाहणे, प्रवास, गिफ्ट कार्ड्स यांचा वापर सोपा होणार आहे. याआधी गुगल पेला अँड्रॉईड पे म्हणून ओळखले जायचे. गुगल पे हे ॲप भारतासह एकूण 79 देशात वापरले जाते.