Dust Storm in Delhi: PC ANI

Dust Storm in Delhi:  दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री अचनाक जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस सुरु झाला. अचानक बदलत्या वातावरणामुळे अनेकांना अडचणींना सामना करावा लागला  आणि जनजीवन विस्कळीत झाली. परंतु दिल्लीतील लोकांना कडक उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने आधीच दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा दिला होता. दिल्लीतील द्वारका येथे मुसळधार पाऊस पडल्याने एक मोठा साईन बोर्ड पडल्याची माहिती समोर येते. (हेही वाचा- NOAA ने वर्तवला गंभीर भूचुंबकीय वादळाचा अंदाज, विस्कळीत होऊ शकते उर्जा प्रणाली

मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका मोरे भागात साईन बोर्ड पडल्याने रुग्णावाहिकेसोबत आणखी दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. अचानक बदलत्या वातावरणामुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट केले की, "दिल्ली आणि एनसीआर (लोनी देहाट, हिंडन एअर फोर्स स्टेशन, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद)." तासाच्या वेगाने धुळीचे वादळ असेल आणि पावसानंतर जोरदार वारेही वाहतील.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांतही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काही अडचणींना समोर जावे लागणार आहे. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह सुसाट पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाली होती.