Sexual Harassment Case: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी आरोप निश्चित
Brijbhushan Sharan Singh (PC -ANI)

Sexual Harassment Case: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणी (Female Wrestler Sexual Harassment Case) आरोप निश्चित केले आहेत. दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) आयपीसी कलम 354 आणि 354 ए अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर एका महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाला पुरेसे पुरावे मिळाले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, प्रत्येक पीडितेच्या संदर्भात ब्रिजभूषण यांच्यावर कलम 354 आणि 354A अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं -

15 जून रोजी, दिल्ली पोलिसांनी ब्रिज भूषण विरुद्ध कलम 354 (विनयभंगाच्या उद्देशाने एखाद्या महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी), 354 ए (लैंगिक छळ), 354 डी आणि कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला. तसेच या सर्व कलमाअंतर्गत ब्रिज भूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा -Brij Bhushan Sharan Singh Grants Regular Bail: लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर)

दरम्यान, 26 एप्रिल रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांबाबतची याचिका फेटाळली होती. ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या याचिकेत न्यायालयाकडे मागणी केली होती की, ज्या दिवशी 7 सप्टेंबर ही तारीख लागू होत होती त्या दिवशी आपण दिल्लीत नव्हतो. असा युक्तिवाद करून ब्रिजभूषण यांनी नव्याने चौकशीची मागणी केली होती. मात्र, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ब्रिजभूषण सिंग यांचा अर्ज फेटाळून लावला.