ओडिशा येथे सापडला 11 फूट लांब आणि 25 किलो वजनाचा विषारी साप; पहा फोटोज
ओडिशा येथे सापडला 11 फूट विषारी साप (Photo Credits: ANI)

सापाचे नाव घेताच अनेकांची दाणादाण उडते. भीती, शहारे एकदम दाटून येतात. साप पाहिल्याच्या, पडकल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. ओडिशा (Odisha) येथील मलकानगिरी जिल्ह्यात (Malkangiri District) एक 11 फुट लांब साप सापडल्याने खळबळ उडाली आहे. या विषारी सापाचे वजन सुमारे 25 किलो आहे. या सापाला स्नेक हेल्पलाईन रेस्क्यू टीमने वाचवले. हा साप पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. ठाणे: नाल्यातील भिंतीत अडकलेल्या 9 फूट लांब अजगराची अखेर सुखरुप सुटका (Watch Video)

यापूर्वी आसाममध्ये (Assam) एका भयानक किंग कोब्राला (King Cobra) पकडण्यात यश आले होते. हा क्रोबा 14 फूट लांब असून आसाममधील नगाव (Nagaon) जिल्ह्यातील जियाजुरी टी इस्टेट (Jiajuri Tea Estate) येथून त्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर त्या सुरक्षित जागी सोडण्यात आले.

ANI ट्विट:

भारतात 276 प्रजातीचे साप आहेत. यातील 36 प्रजाती मध्यप्रदेश मध्ये आहेत. यात सुमारे 50 प्रजाती विषारी आहेत. कोब्रा हा सर्व सापांमध्ये सर्वात विषारी साप समजला जातो. भारतात प्रत्येक वर्षी सुमारे 20,000 लोकांचा मृत्यू हा साप चावल्याने होतो.