Nangara vastu sangrahalay PC YOUTUBE

International Museum Day: वैविध्यपूर्ण संस्कृती आणि समृध्द इतिहास असलेल्या भारतात असंख्य वास्तू संग्रहालय आहेत. प्राचीन काळापासून ते समकालीन कलेपर्यंत ही संग्रहालये आपल्या देशाचा भुतकाळ आणि वर्तमान काळ जतन करतात. प्रत्येक संग्रहालये देशाचा सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करतो.  संग्रहालयाच्या माध्यमातून आजची पिढी आणि भावी पिढी इतिहासाचा अभ्यास करते. दरवर्षी 18 मे रोजी जगभरात आतंरराष्ट्रीय संग्रहालय दिवस (International Museum Day) साजरा केला जातो. भारतात ठिकठिकाणी भव्य वास्तू संग्रहालय आहे. त्यात लवकरच आणखी एका वास्तू संग्रहालयाची भर पडणार आहे. ते म्हणजे वाशिम जिल्ह्यातील नंगारा वास्तू संग्रहालय.  (हेही वाचा-  त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

देशात 10 ते 15 कोटी बंजारा समाजाची लोकसंख्या असल्याचे मानले जाते. पूर्वीपासून हा समाज वैविध्यपूर्ण आणि सांस्कृतिने परिपूर्ण आहे. या गोर समाजाचा सांस्कृतिक ठेवी जपणारा,  स्वतंत्र वास्तू संग्रहालय वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे बांधण्यात येणार आहे. करोडो बंजारा लोकांचे देवस्थान असलेले पोहरागड लवकरच देशात झळकणार आहे. नंगारा वास्तू संग्रहालयामुळे (गोर) बंजारा समाजातील ऐतिहासिक ठेवा जतन केला जाणार आहे.

जाणून घ्या वास्तूची विशेष माहिती 

नंगारा वास्तू संग्रहालय हा बंजारा समाजाची संस्कृती देवाण घेवाण करण्यासाठी आणि बंजाराचा विकास म्हणून ओळखला जाणार आहे. निर्माणधीन नंगारा वास्तू संग्रहालयामध्ये बंजारा संस्कृती व समाज जीवनाचे तसेच, बंजाराचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराजांचा जन्म, त्यांच्या जीवनातील प्रसंग, बंजारा समाजातील होळी सण उत्सव, स्वातंत्र्य चळवळीत बंजारा समाजेचे योगदान, देशपातळीवर बंजारा समाजातील विविध क्षेत्रातील नावलौकिल मिळालेल्या व्यक्ती याबाबतची माहिती आणि प्रदर्शन या संग्रहालयात उपलब्ध राहणार आहे.

या वास्तू संग्रहालयाचे काम ऑगस्ट २०२४ पर्यंत संपेल.  या वास्तू संग्रहालयामुळे परिसरात विकामकामे करण्यात आली आहे. या संग्रहालयामुळे पोहरागड येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. यातून परंपरेचे संवर्धन, भाषा, पोषाख आणि खाद्य संस्कृतीची ओळख पर्यटकांना होईल. या संग्रहालयात १२ गॅलेरीचा समावेश आहे. तसेच प्रोजेक्टर लावण्यात येणार आहे.