Viral Video: पाणीपुरी वाल्या भैयाची स्टाइल पाहून नेटकऱ्यांना हसु आवरेना, अहमदाबादचा व्हिडिओ व्हायरल
Viral Pani Puri PC TWIITER

Viral Video: सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रसिध्द होण्यासाठी विक्रेते अनोख्या स्टाइलने खाद्यपदार्थ विकतात. नागपूरचा डॉली चायवाला सोशल मीडियावर त्याच्या वेगळ्या स्टाइलमुळे प्रसिध्द झाला. डॉली चायवाला नंतर आता पाणीपूरी वाला भैया सोशल मीडियावर नेटकऱ्यांची लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. पाणीपूरीवाला भैय्या त्याच्या स्टाईलमुळे नेटकऱ्यांची आणि ग्राहकांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. (हेही वाचा- "डिझेल पराठा" असे काही नाही, मनोरंजनासाठी बनवला होता व्हिडीओ, हॉटेल चालकने दिली माहिती)

मिळालेल्या माहितीनुसार, हा मटका पाणी पुरी वाला अहमदाबाद येथील आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर themealcrackers नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे – तो फक्त दिखावा करत आहे. तर एकाने लिहले आहे की, पुष्पा भाऊ पाणीपुरी वाला.

 

विक्रेता पाणीपूरी एका अनोखा पध्दतीने बनवत आहे. रस्त्याच्या कडेला असलेला हा पाणीपुरी वाला त्याच्याकडे पाणीपुरी खालया लोकांनी गर्दी केली आहे.पाणीपुरी बनवण्यापूर्वी तो हवेत फेकतो आणि मग पकडतो. हा व्हिडिओ अहमदाबादचा असल्याचे सांगितले जात आहे. याच्याकडे मटका पाणीपुरी आहे. जे लोकांना पंसत आली आहे. ही खास मटका पाणीपुरी खाण्यासाठी दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.