Diesel Paratha Viral Video: सध्या सोशल मीडियावर ‘डिझेल पराठा’चा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चंदीगडमधील खाद्यपदार्थ विक्रेते पराठे शिजवण्यासाठी डिझेल वापरत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आरोग्याकडे होत असलेल्या अशा दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त करत अन्न विभागाने कारवाई करण्याचे आवाहन केले. मात्र, आता ढाब्याच्या मालकाने असे दावे फेटाळून लावले आहेत. ढाबा मालक चन्नी सिंग यांनी सांगितले की, तो 'डिझेल पराठा' असे काहीही बनवत नाही किंवा ग्राहकांना असे काही देत नाही. एका ब्लॉगरने तो व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवला होता.
पाहा व्हिडीओ
#WATCH | In a viral video, a man in a Chandigarh dhaba was seen claiming that the oil he uses to make parathas is diesel. Owner of the dhaba refutes such claims.
Channi Singh, owner of the dhaba says, "We neither make any such thing as 'diesel paratha' nor serve any such thing… pic.twitter.com/15BJ7lMSR3
— ANI (@ANI) May 15, 2024
'डिझेल पराठा असं काही नाही' चन्नी सिंग पुढे म्हणाले की, डिझेलमध्ये कोणताही पराठा शिजवता येत नाही, हे सर्वसामान्यांना माहीत आहे. व्हिडिओ व्हायरल होईल हे मला माहीत नव्हते. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या ब्लॉगरनेही तो काढून टाकला असून लोकांची माफीही मागितली आहे. आम्ही फक्त खाद्यतेल वापरतो आणि लोकांना स्वच्छ अन्न पुरवतो. आम्ही येथून लंगर देखील पुरवतो. आम्ही लोकांच्या जीवाशी खेळत नाही.
डिझेलमध्ये पराठे तळतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे वास्तविक, व्हायरल व्हिडिओमध्ये एक खाद्य विक्रेता पराठे शिजवण्यासाठी डिझेलचा वापर करत असल्याचे दिसत आहे. येथे, रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये, एक माणूस पीठ मळून घेतो आणि नंतर त्यात बटाटे भरतो. यानंतर तो कढईत भाजतो आणि पराठ्यावर भरपूर तेल टाकतो. जेव्हा एका फूड व्लॉगरने त्याला विचारले की आपण काय शिजवतो, तेव्हा त्याने उत्तर दिले की तो "डिझेल पराठा" बनवत आहे.