Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला फक्त 209 धावा करता आल्या.
Rajasthan Royals vs Punjab King IPL 2025 59th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 59 वा सामना रविवार म्हणजे 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम विरुद्ध पंजाब किंग्ज क्रिकेट टीम (RR vs PBKS) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात विजय मिळवून पंजाबने प्लेऑफमधील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला फक्त 209 धावा करता आल्या.
Match 59. Punjab Kings Won by 10 Run(s) https://t.co/HTpvGew6ef #RRvPBKS #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
नेहल वधेरा आणि शशांक सिंगची दमदार खेळी
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमावून राजस्थानसमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. यादरम्यान नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांनी दमदार खेळी केली. नेहलने 37 चेंडूत 70 धावा आणि शशांकने 30 चेंडूत 59 धावा केल्या. तर राजस्थानकडून तुषार देशपांडे सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
हरप्रीत ब्रारने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट
प्रत्युत्तरात राजस्थान संघाला 20 षटकात 7 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या. राजस्थाकडून यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतकीय खेळी केली पण ते सघांला विजय मिळवून देवू शकले नाही आणि संघाला फक्त 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मार्को जानसेन आणि अजमतुल्ला उमरझाईला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2025 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

