Mumbai Crime: नोकरी देण्याच्या बहाण्याने वरळीत 24 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai: मुंबईतून (Mumbai) धक्कादायक बातमी समोर येत आहे. 24 वर्षीय महिलेवर नोकरी देण्याच्या बहाण्याने बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका 24 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. ही घटना शहरातील वरळी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. जोसेफ जेम्स (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. वरळी पोलिसांनी (Warali Police) दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने नोकरीच्या शोधात तिच्या एका पुरुष मित्राची मदत घेतली होती. पीडित महिलेच्या मैत्रिणीने तिला जोसेफ नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी पीडितेच्या मित्राने फोन करून जोसेफला तिला खारमध्ये भेटायचे असल्याचे सांगितले. पीडितेने ताबडतोब खारला टॅक्सी केली, जिथे तिचा मित्र आणि जोसेफ पीडितेसोबत सामील झाले. नंतर हे तिघे एका हॉटेलमध्ये गेले आणि दारू पिऊन मध्यरात्रीच्या सुमारास घराकडे निघाले. (हेही वाचा - Navi Mumbai: बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी नवी मुंबईत 26 वर्षीय तरुणाला अटक; कॉटन पेपर, कटर, स्पार्कल सेलो टेपच्या साहाय्याने बनवल्या नोटा)

पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती खार स्टेशनला जात असताना जोसेफने तिला स्टेशनवर सोडण्याची ऑफर दिली. मात्र, तोपर्यंत कोणतीही ट्रेन उपलब्ध होणार नाही, असे सांगून त्याने तिला स्टेशनवर नेले नाही. पीडितेने पोलिसांना सांगितले की, पहाटे तीनच्या सुमारास ती त्याच्या कारमध्ये झोपली असताना जोसेफने तिचा विनयभंग सुरू केला. तिने विरोध केल्यावर त्याने जबरदस्तीने तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, जोसेफने तिला धमकावले आणि या घटनेबद्दल कोणाशीही बोलू नको, असं सांगितलं. तथापि, पीडितेने हा संपूर्ण प्रकार तिच्या वकील मित्राला सांगितला. ज्याने तिला ताबडतोब तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर तिने जवळचे पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.