PhonePe Launches UPI Payments In Sri Lanka: डिजिटल जगात भारत सतत प्रगती करत आहे. पैशांचा व्यवहार असो वा इतर पेमेंट, अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठा वाटा युपीआयचा पेमेंट सेवेचा आहे. आता फिनटेक कंपनी फोन पे (PhonePe) च्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीलंकेला जाणारे भारतीय फोन पे ॲपच्या मदतीने सहज युपीआय पेमेंट करू शकतील. यासाठी फोनपे कंपनीने 15 मे रोजी श्रीलंकेच्या Lankapay सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. यामुळे युपीआय आणि LankaPay च्या भागीदारीद्वारे व्यवहार सुलभ होतील. ही सेवा वापरकर्त्यांना रोख रक्कम आणि चलन विनिमयाच्या समस्येपासून मुक्त करेल. तसेच हा व्यवहार जलद आणि सुरक्षित असेल. भारताचा युनिफाइड पेमेंट इंटरफेस आता नेपाळ, भूतान, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांत वापरला जात आहे. ही सेवा तिथल्या भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असेल. (हेही वाचा: Fake Calls Alert: बनावट कॉल्सपासून रहा सावध! कनेक्शन तोडण्याची धमकी देत होत आहे आर्थिक फसवणूक, टेलिकॉम ऑपरेटर्सनी दिला इशारा)
पहा पोस्ट-
Unlocking new frontiers in fintech connectivity! @PhonePe UPI payments goes live in 🇱🇰 with HC @santjha & @CBSL Governor Dr. Nandalal Weerasinghe gracing the launch event. Giving a boost to @UPI_NPCI services, the launch will further strengthen ease for 🇮🇳 tourists in 🇱🇰. pic.twitter.com/VksYE0ZHg3
— India in Sri Lanka (@IndiainSL) May 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)