Rescued a python that was stuck in a wall (Photo Credits: Twiiter)

मुंबईसह ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. याचे विविध पडसाद शहरांवर उमटले. यातच ठाण्यातील एका नाल्यातील भिंतीत एक अजगर नागरिकांना आढळून आला. मुसळधार पावसामुळे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे तो अजगर भिंतीतच अडकून पडला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजगराची सुखरुप सुटका करण्यात आली. 9 फूट लांब असलेल्या या अजगराची अखेर सुटका करण्यात आली असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

ANI ट्विट:

 

पहा व्हिडिओ:

पावसाळ्यात जमिनीत दडून बसलेले अजगर, साप यांसारखे प्राणी बाहेर पडू लागतात. अनेकदा वाटा चुकल्याने ते कधी लोकल ट्रेन, रस्ते, इमारतींमध्ये आढळून येतात.