Uttar Pradesh Road Accident: अमरोह येथे बसचा भीषण अपघात, पाच जण गंभीर जखमी
Amroha Accident PC TWiiter

Uttar Pradesh Road Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अमरोह येथील राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी झाला. हा अपघात दिदौली पोलिस ठाण्याजवळ झाला. अपघातात जखमी झालेल्या मुरादाबादच्या पाकबार येथील टीएमयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा-  हरियाणातील नूह येथे पर्यटक बसला आग; 8 जणांचा मृत्यू, 24 जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, बस अमरोह येथून जात होती. अनियंत्रित बसचा ट्रकला धडक लागल्याने हा अपगात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात बसचा अक्षरशा: चुराडा झाला आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा घात झाला. अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अपघातस्थळी आले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. घटनास्थळी अमरोहचे सर्कस ऑफिस दाखल झाले. त्यांनी माध्यमांना माहिती दिली की, बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आणि पाच जण जखमी झाले. एका जखमी महिलेला हैर सेंटर रुग्णालयात दाखल केले आहे.

शुक्रवारी दुपारी राजस्थान येथील भरतपूरच्या हल्दीना गावात अपघात झाला होता. या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि १२ जण गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस अपघाताची मालिका वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या या अपघातामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.