RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या चुरशीच्या सामन्यात बंगळुरुने सीएसकेचा पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तत्तपुर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या बंगळुरुने चेन्नईसमोर 219 धावांचे लक्ष्य ठेवले. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 54 धावांची शानदार खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावाच करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर रचिन रवींद्रने सर्वाधिक 61 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून यश दयालने सर्वाधिक दोन बळी घेतले.
𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂 seal the final spot for #TATAIPL 2024 Playoffs ❤️
What a turnaround 🫡
Scorecard ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/yHS7xnEn8x
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)