RCB Players at Bengaluru Airport: बेंगळुरू विमानतळावर आरसीबी खेळाडूंचे जोरदार स्वागत; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार स्वत: उपस्थित (Video)

आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकून आरसीबी संघ बेंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. संघ विमानतळावर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वागत केले.

RCB Players at Bengaluru Airport: बेंगळुरू विमानतळावर आरसीबी खेळाडूंचे जोरदार स्वागत; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार स्वत: उपस्थित (Video)
Photo Credit- X

RCB Players at Bengaluru Airport: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (Royal Challengers Bengaluru)मंगळवारी, 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकले. आरसीबीने 18 वर्षांत जिंकलेले हे पहिले आयपीएल जेतेपद आहे आणि विराट कोहलीसाठीही हे पहिले आयपीएल जेतेपद आहे. आरसीबी संघ बेंगळुरूमध्ये विमानतळावर येताच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (Deputy CM DK Shivakumar)यांनी स्वागत केले. श्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी क्रिकेटपटूंसोबतचे त्यांचे फोटो काढले. त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली, 'तुम्हा सर्वांचे बेंगळुरूमध्ये स्वागत करणे खरोखर सन्मानाची गोष्ट आहे' असे कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).