Ghaziabad Shocker: हुंड्यासाठी आजही महिलांचा छळ होत असल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मधील गाझियाबाद(Ghaziabad)मध्ये तर नराधन पतीने पत्नीची लाजच चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. फॉर्च्युनर कारच्या हव्यासापोटी पत्नीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रांसोबत त्याने शेअर केले(Husband Leaked Wife's private photo and video). या प्रकरणी तसेच हुंड्यासाठी(dowry demand) पत्नीचा छळ केल्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एप्रिल महिन्यात, आरोपी पतीने तिला त्यांच्या नोएडा एक्स्टेंशन येथील घरातून बाहेर काढले होते. फॉर्च्युनर एसयूव्ही कार घेऊनच परत ये अशी ताकीद पिडीत पत्नीला दिली होती. (हेही वाचा: Delhi Hospitals Receive Bomb Threat Calls: दिल्लीतील 4 रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर )
त्यानंतर महिलेने कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पती आणि सासरच्या तीन मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप पिडीतेने केला. ३ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे लग्न झाले होते. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहितेकडे वारंवार फॉर्च्युनर कारसाठी तगादा लावला होता. असे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे.
मांसाहार करण्यास भाग पाडले, खाजगी फोटो शेअर
पीडितेने तक्रारीत दावा केला की, तिच्या सासरच्यांना फॉर्च्युनर हवी होती, परंतु तिच्या कुटुंबीयांनी टाटा नेक्सॉन तयार होते, त्याशिवाय, हुंड्यात 40 लाखांपेक्षा जास्त पैसे दिले होते. SUV ची किंमत 30 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांना ते परवडत नव्हते. विशेष म्हणजे मांसाहार करण्यास आणि दारू पिण्यास महिलेला आरोपींनी प्रवृत्त केले. तिने नकार देताच आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. शिवाय, त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ बहीण आणि एका मित्राला शेअर केले.
गुन्हा दाखल
हुंडा कायदा, IPC कलम 498A (महिलेचा पती किंवा नातेवाईक तिच्यावर क्रूरता दाखविणे), 323 (स्वेच्छेने दुखावल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत या प्रकरणी महिलेचा पती आणि तिच्या सासरच्या तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकी), ACP कवी नगर अभिषेक श्रीवास्तव यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.