UP Woman Injected With HIV-Infected Needle प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

UP Woman Injected With HIV-Infected Needle: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्या सासरच्यांनी एचआयव्ही बाधित इंजेक्शन (HIV-Infected Injection) दिले. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्यांनी महिलेसोबत हे घृणास्पद कृत्य केलं. यासंदर्भात पीडित महिलेच्या पालकांनी मुलीच्या सासरच्या मंडळीवर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी सध्या पोलिस करत आहेत. या प्रकरणी महिलेचा पती आणि तिच्या दिरासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गंगोह पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक (एसएचओ) रोझंत त्यागी यांनी महिलेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह 15 फेब्रुवारी 2023 रोजी अभिषेक सोबत झाला होता. लग्नाच्या वेळी महिलेच्या वडिलांनी दागिने, रोख रक्कम आणि गाडी इत्यादी हुंड्याच्या स्वरूपात आपल्या क्षमतेपेक्षा जास्त दिले होते, परंतु तिच्या सासरच्या लोकांना ते आवडले नाही. त्यांनी एक मोठी गाडी आणि अतिरिक्त 25 लाख रुपयांची मागणी केली. (हेही वाचा - UP Shocker: भूताची भीती की मानसिक विकार? तब्बल 36 वर्षांपासून स्त्रीच्या वेशात जगतोय पुरुष, समोर आले धक्कादायक कारण)

सासरच्यांकडून महिलेचा छळ -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, जेव्हा ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा सासरच्यांनी त्यांच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. तथापी, पोलिसांनी सांगितले की, जेव्हा पालकांनी त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. पीडित महिलेच्या कुटुंबाचा आरोप केला की, हुंड्यामुळे त्यांच्या मुलीला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले गेले, ज्यामुळे तिचा जीव धोक्यात आला. (हेही वाचा: Pregnant Woman Sexually Assaulted: तामिळनाडूमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार; आरडा-ओरडा केल्याने आरोपींनी पीडितेला ट्रेनमधून फेकलं

दरम्यान, एसएचओ रोझंत त्यागी यांनी सांगितलं की, महिलेचा पती आणि दिरासह चार जणांविरुद्ध आयपीसीच्या कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) आणि घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.