Pregnant Woman Sexually Assaulted: तामिळनाडूतील (Tamil Nadu) वेल्लोर (Vellore) मध्ये ट्रेनमध्ये चार महिन्यांच्या गर्भवती (Pregnant woman) महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulted) झाल्याची घटना समोर आली आहे. एवढचं नाही तर जोल्लारपेट्टईजवळ या पीडित महिलेला ट्रेनमधून खाली ढकलण्यात आलं. कोइम्बतूरमधील एका कपड्यांच्या कंपनीत काम करणारी ही महिला चित्तूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. येथे कोचमध्ये दोन पुरूषांनी तिचे लैंगिक शोषण केले. ती तिथून उठून वॉशरूममध्ये गेली तेव्हा ते तिच्या मागे गेले. त्यानंतर मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. जेव्हा ती मदतीसाठी ओरडू लागली तेव्हा आरोपीने तिला केव्ही कुप्पमजवळ ट्रेनमधून ढकलून दिलं.
लैंगिक अत्याचारानंतर महिलेला ट्रेनमधून ढकललं -
आरोपींनी महिलेला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याने महिलेच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी जोल्लारपेट्टई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तथापी, हेमराज नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. (हेही वाचा -Girl Sexually Assaulted In Dombivli: डोंबिवलीत 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; 35 वर्षीय व्यक्तीला अटक)
मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार -
चार दिवसांपूर्वीच मुंबईत अशीच एक भयानक घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार करण्यात आला होता. मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये एका महिलेवर एका कुलीने बलात्कार केला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेच्या तक्रारीवरून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
रेल्वे पोलिस (जीआरपी) अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला आणि तिचा मुलगा शनिवारी रात्री ट्रेनने वांद्रे टर्मिनसला पोहोचले. तिथे ट्रेनमधून उतरल्यानंतर, ती महिला दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी त्या ट्रेनमध्ये दुसरा कोणीही प्रवासी नव्हता. दरम्यान, एका कुलीने संधी साधत महिलेवर बलात्कार केला.